रावेर : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टरसह ट्रॉली महसूल विभागाने शनिवारी मध्यरात्री जप्त केल्याने अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली असून अशीच कारवाई पालसह रावेर परीसरातदेखील करण्याची मागणी आहे.
अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ
अवैध वाळू वाहतूक करणार्या तीन ट्रॅक्टरसह ट्रॉलीवर रावे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, 18 रोजी रात्रीच्या वेळी महसूल पथकाने कारवाई केली. बलवाडी येथील सुकी नदीपात्रातून विनापरवाना वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई खिर्डी मंडळ अधिकारी, रावेर मंडळाधिकारी, सावदा मंडळ अधिकारी, खिरोदा प्र.यावल मंडळ अधिकारी, बलवाडी तलाठी, शिंगाडी तलाठी शिंगाडी, गाते तलाठी यांच्या पथकाने बलवाडी येथील सुकी नदी पात्रातून विनापरवाना रेती वाहतूक होताना केली.