गोदावरीचा ’मृगोत्सव’उत्साहात

0

जळगाव । गोदावरी संगीत महाविद्यालयात झालेल्या मृगोत्सवात ’रिमझिम रिमझिम सावन बरस’ या सूर मल्हार रागातील बंदिशीसह ’पावसात वेडे मन मोर नाचले’ सारख्या गीतांनी रसिक चिंब झाले. गोदावरी संगीत महाविद्यालय आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने या ’मृगोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. यात गायन, वादन नृत्य विभागातील विद्यार्थ्यांनी कलेचे सादरीकरण केले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संचालिका डॉ.वर्षा पाटील, डॉ.प्रियंका पाटील, डॉ.प्राची सुरतवाला, गोदावरी पाटील उपस्थित होते. या वेळी कथ्थक विभागाच्या विद्यार्थिनींनी ’रिमझिम सावन बरसे’ या गीतावर नृत्य केले. यात शानवी शाह, श्रेया पाटील, सेजल चौधरी, हर्षिता भोरटक्के, कुंजल चौधरी, अंकिता हरणकर, प्रांजल जगताप यांनी नृत्य सादर केले. वरुण नेवे, विकी सोनवणे यांनी सूर मल्हार रागातील बंदिश, ’घन आज बरसे’ हे गीत, चैताली सोनार, ऋतुराज जोशी, पीयूषा नेवे, उत्कर्ष जैन, प्रियंका सैतवाल यांनी सादर केले. तर ’पावसात वेडे मन मोर नाचले’ हे गीत महिमा जैन, आरती धाडिवाल, वैष्णवी म्हाळस, श्रद्धा ओवे, रोहिणी पाठक, प्रिया बुरकुले, श्रुती भिंगारे, रीतिका मांडगे, दर्शना काथार, स्वाती अहिरराव, ललिता अमृतकर, सरला वाघ यांनी सादर केले. प्रवीण महाजन यांनी तबल्यावर साथ संगत दिली.