जळगाव । राष्ट्रीय आरोग्य अभियानांर्तगत गोदावरी फाऊंडेशन संचलित मोबाईल युनिट प्रकल्पातर्फे सावखेडा येथे मोफत तपासणी शिबीर घेण्यात आले. गोदावरी फाउंडेशन व जिल्हा एकात्मीक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसा. जि.प जळगाव यांच्या सयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियानार्तंगत यावल तालुक्यातील सावखेडा येथील आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबीराचे उद्घाटन सरपंच फकीरा तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
गरजू रूग्णांनाउपचारासाठी सल्ला व मार्गदर्शन
शिबीरात 267 जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यातील गरजू रूग्णांना पुढील उपचारासाठी सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. डॉ माया आर्विकर डॉ देवेंद्र पाटील, डॉ पराग महानकर, डॉ. चव्हाण, डॉ.रूपरेखा संकाळ अशी तज्ञांची टिम कार्यरत आहेे.
मोफत रक्त लघवी चाचण्या
शिबीरांतर्गत मोफत रक्त लघवी चाचण्या व औषधीचे वाटप करण्यात येत आहे. लोहारा येथे दि. 8 मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्त नागरीकांनी या शिबीरात सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.