गोदावरीत विद्यार्थ्याचा मृतदेह हाती

0

औरंगाबाद: वैजापूर तालुक्यातील बाबतारा येथे दोन शालेय विद्यार्थी नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली होती. अग्निशमन दलाचे बचावकार्य चालू असताना एका मुलाचा मृतदेह कोल्हापुरी बंधाऱ्यात आढळून आला आहे.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील गोदावरी नदीचे पात्र काठोकाठ भरले आहे. आठवीत शिकणारे दोन विद्यार्थी गोदावरीच्या पात्रात सोमवारी बुडाले होते. तुषार गांगड आणि विवेक कुमावत अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. अग्निशमन दलाच्या मदतीने शोधकार्य सुरू होते. मंगळवारी नाऊर येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात यापैकी एकाचा मृतदेह आढळून आला. दुसऱ्या मुलाचा शोध अद्यापही सुरू आहे.