बीड : पैठणच्या नाथसागराचे 18 दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजता गोदावरी नदीतील पाणी राक्षसभुवन येथील पात्रात पोहोचले. सकाळी सहा वाजता येथील शनिमंदिरात पाणी शिरले. या पुराच्या पाण्यात शनीसह राहु, केतु, गुरू अशी चार ग्रहाची मंदिरे, पांचाळेश्वर येथील दत्त मंदिर अशी एकूण सात मंदिरे पुराच्या पाण्यात गेली आहेत.