गोदावरीसह राज्यराणी एक्स्प्रेस रद्द

0

हुतात्मा एक्स्प्रेस दौंडमार्गे वळवली तर सेवाग्राम नाशिकपर्यंत चालवण्याचा निर्णय

भुसावळ- मध्य रेल्वेच्या मुंबईत विभागात विपूल पाऊस सुरू असल्यामुळे 3 रोजी अप-डाऊन गोदावरीसह राज्यराणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली तर अप-डाऊन हुतात्मा एक्स्प्रेस कल्याणऐवजी मनमाड-दौंड मार्गाने सोडण्यात आली शिवाय सेवाग्राम एक्स्प्रेस केवळ नाशिकपर्यंत व परतीच्या प्रवासातही नाशिक ते नागपूरपर्यंत चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याने सलग तिसर्‍या दिवशी रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, या व्यतिरीक्त तब्बल 18 रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

अप-डाऊन गोदावरीसह राज्यराणी रद्द
मुंबईतील पावसामुळे अप गाडी 12118 अप आणि डाऊन 12117 मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिलन्स गोदावरी एक्स्प्रेस तसेच अप 22102 व डाऊन 22101 मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाने रद्द केल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, अप 11025 आणि डाऊन 11026 भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस 3 रोजी कल्याणऐवजी मनमाड-दौंड मार्गाने वळवण्यात आली.

सेवाग्राम केवळ नाशिकपयंत
अप 12140 नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस नागपूरवरून 2 रोजी सुटलेली गाडी केवळ नाशिक स्थानकापर्यंत चालवण्यात आली शिवाय परतीच्या प्रवासात डाऊन 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस मुंबई ऐवजी नाशिक ते नागपूरपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अप-डाऊन मार्गावर तब्बल 18 गाड्या उशिराने
मुंबईतील पावसाने बुधवारी मुंबईकडून येणार्‍या डाऊन मार्गावरील साकेत एक्स्प्रेस तीन तास, पवन, कामायनी व गोदान एक्स्प्रेस प्रत्येकी दोन तास, गुवाहाटी एक्स्प्रेस 2 तास 20 मिनिटे, काशी एक्स्प्रेस एक तास, कुशीनगर सात तास, हावडा मेल नऊ तास, पटना सुपर 11 तास आणि गितांजली एक्स्प्रेस एक तास विलंबाने धावली तसेच अप मार्गावरील पुष्पक एक्स्प्रेस एक तास 15 मिनिटे, कनार्टक एक्स्प्रेस एक तास, काशी एक्स्प्रेस तीन तास 30 मिनिटे, वाराणशी-कुर्ला रत्नागिरी एक्स्प्रेस 30 मिनिटे, ताप्ती गंगा एक्स्प्रेस दोन तास, गीांजली एक्स्प्रेस दोन तास, कामायनी एक्स्प्रेस दोन तास, लखनऊ एक्स्प्रेस एक तास उशिराने धावली.