जळगाव । येथील गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमानंतर अविष्कार करत सौरउर्जेवरील जलशुध्दीकरण यंत्राची निर्मीती केली आहे. गोदावरी अभियांत्रिकीच्या अंतिम विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या मनोज हेंमत फालक, पियुष दिनकर कुरकुरे, निखिल अंनता भंगाळे, विपुल सुनिल देशमुख यांनी इलेक्ट्रीकल विभागप्रमुख प्रा अतुल बर्हाटे, प्रा महेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार यंत्राची निर्मीती केली. सदर यंत्रात पाणी साठवण्याची क्षमता ही 15 लिटर एवढी असून मोबाईल चार्जींग व एक एलईडी बल्ब लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बॅटरी बॅकअप चांगला असल्याने रात्री देखिल उपयोगात येउ शकणारे हे यंत्र पोर्टेबल लहान साईजमध्ये असल्याने हाताळणे सोपे जाते.
दुर्मीळ भागात जेथे विज उपलब्ध नाही तसेच पावसाळी आणि पुरग्रस्त भागात, तसेच मिलेट्रीचा वावर असलेल्या भागात उपयोगी ठरणारे हे यंत्र आहे. सदर यंत्रासाठी फक्त 15 हजार रूपये खर्च लागला असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगीतले. गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.व्ही.जी. अराजपूरे, उपप्राचार्य प्रविण फालक यांनी या विद्यार्थी व प्राध्यापकांचे यशस्वी प्रयोगाबददल अभिनंदन केले आहे. डॉ.अराजपूरे यांची नुकतीच प्राचार्यपदी निवड झाल्यानंतर आपल्या ज्ञानाचा मार्गदर्शनाने हे संशोधन पुर्ण झाले असून उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात चांगल्या संशोधन वाढीस चालना मिळाली आहे. नुकतीच या सौरउर्जेवरील जलशुध्दीकरण यंत्राची यशस्वी चाचणी महाविद्यालयात प्राचार्य डॉ अराजपूरे व उप्रपाचार्य प्रविण फालक यांनी घेतली.