नाशिक: गेल्या आठवड्याभरापासून पावसाच्या संततधारा सुरु आहे. काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. नाशिकमधील गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. गोदावरी नदी किनाऱ्यावरील रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी काठची वाहने वाहून गेल्याची घटना घडली आहे.