जळगाव- डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या गोदावरी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल नातेवाईकास भेटायला आलेल्या तरुणाची 40 हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरट्यांनी 27 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेदरम्यान लांबवली. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रावेर तालुक्यातील चिनावल येथील दिनेश दिनकर नेमाडे (वय 23) हे रेल्वेत नोकरीला आहेत. ते कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल नातेवाकाईकास 27 रोजी सकाळी 10 वाजता भेटण्यासाठी आले होते. त्यांनी रुग्णालय परिसरातील पार्किंगमध्ये मोटारसायकल (क्र.एमएच 19 डीपी 2645) लावली होती. नातेवाईकाची भेट घेतल्यानंतर ते घरी जाण्यासाठी पार्किंगमध्ये लावलेल्या मोटारसायकलच्या जागेवर गेले. परंतु, त्या जागेवर मोटारसायकल नव्हती. मोटारसायकलची चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर दिनेश नेमाडे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास हेड कॉन्स्टेबल मोहन चौधरी करीत आहेत.