जळगाव: गोदावरी सीबीएसई स्कुलमध्ये नुकताच शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गोदावरीताई पाटील, सुधाताई डी पाटील, प्राचार्य निलीमा चौधरी हे प्रमुख उपस्थीत होते.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन करण्यात आले. शिक्षीका असलेल्या गोदावरी आजीनी मुलींना शिक्षकाचे महत्व विषद करून सांगीतले तसेच पुर्वीच्या काळी आणी आजच्या शिक्षणपध्दतीत झालेल्या बदलाबददल माहिती दिली. यावेळी शाळेच्या शिक्षीका सुर्वण बडगूजर यांना नवीदिल्ली येथील ग्लोबल शिक्षक पुरस्कार जाहिर झाल्याबदल सत्कार करण्यात आला. कलाशिक्षक दत्तात्रय कराळे यांच्या स्मरणचित्राच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भुमिका बजावत शाळा चालवली तर दहाविच्या विद्यार्थ्यांनी गायन,वादन नृत्यकलेतून शिक्षणाचे महत्व विषद केले. आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी शिक्षकाप्रती आदर व्यक्त केला.