गोदावरी हॉस्पीटलमध्ये स्त्रीरोग तपासणी शिबिर

0

जळगाव । भास्कर मार्केट जवळील गोदावरी प्रसुतीगृह येथे 1 जूनपासून महिलांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात गर्भवती महिलांची तपासणी तसेच स्त्रीयांचे गर्भाशयाचे विविध आजार जसे गर्भाशयपिशवी,गर्भाशयाचा कँन्सर, गर्भपिशवी काढणे, गर्भाशय गाठीचे आजार, गर्भाशयाचा टयुमर, प्रसुतीपुर्व व प्रसूतीनंतर गर्भवती स्त्रीयांनी घ्यावयाची काळजी व वंधत्व निवारण याबाबत सल्ला व मार्गदर्शन देखिल करण्यात येणार आहे . गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन शिबीरास 1 जूनपासून प्रारंभ होणार असून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गोदावरी प्रसुतिगृहातर्फे करण्यात आले.