जळगाव । जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत भोकर गटामध्ये राष्ट्रवादीच्या तथाकथित विधानसभा क्षेत्रप्रमुख गोपाळ फकिरचंद पाटील यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात उघडरीत्या काम केले व याचा फटका पक्षाला बसला.तसेच प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या भोकर व कानळदा येथील प्रचार सभेत त्यांनी फक्त भाजपा चे जि.प.चे उमेदवार यांचे विरोधातच भाषण केले.शिवसेनेच्या जि.प. उमेदवाराविरोधात ब्र शब्दसुद्धा काढला नाही व जातीवादी प्रचार करत नैतिकदृष्ट्या आपल्या राष्ट्रवादीच्या पदाचा राजीनामा न देता पक्षविरोधी काम केले.