गोमांस खाणे थाबाविल्यास हल्ले होणार नाही-वसीम रिझवी

0

नवी दिल्ली-गोमांस खाल्याचा संशयाने अनेक ठिकाणी मुस्लिमांना मारहाण होत असते. प्रत्येक ठिकाणी पोलीस किंवा सुरक्षा रक्षक नसतात त्यामुळे जमावाकडून होणारे हल्ले थांबवणे अशक्य आहे. मात्र जर मुस्लिमांनी गोमांस खाणे बंद केले तर हल्ले होणार नाही. इस्लाममध्ये गोमांस खाणे हे हराम मानले गेले आहे असे शिया वक्फ बोर्डाचे सदस्य वसिम रिझवी यांनी सांगितले. एवढेच नाही तर गोहत्या करणाऱ्यांविरोधात कायद्यात कठोर तरतूद असली पाहिजे असेही रिझवी यांनी म्हटले आहे.

आज सकाळीच गोमांस खाणे बंद केल्यास जमावाकडून होणाऱ्या हत्यांचे सत्रदेखील थांबतील, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केला त्यानंतर आता शिया वक्फ बोर्डाचे सदस्य वसिम रिझवी यांचेही असेच वक्तव्य समोर आले आहे. गोहत्या करण, गोमांस खाणे इस्लाममध्ये हराम आहे. त्यामुळे मुस्लिमांनी हे कृत्य करूच नये. मॉब लिंचिंग अर्थात जमावाकडून हल्ला होण्याच्या घटना आपण थांबवू शकत नाही मात्र गोमांस खाणे सोडू शकतो. असेही रिझवी यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये मॉब लिंचिंग अर्थात जमावाकडून हल्ले होण्याच्या घटना देशामध्ये वाढीस लागल्या आहेत. कथित गो रक्षकांनी हे हल्ले केले आहेत हेदेखील वारंवार समोर आले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का बोलत नाहीत असाही प्रश्न विरोधकांनी विचारला. आता शिया वक्फ बोर्डानेच मॉब लिंचिंग थांबवता येईल की नाही ठाऊक नाही मात्र मुस्लिमांनी गोमांस खाणे गैर असल्याचे म्हटले आहे.