गोमांस मागितल्यामुळे नवरीने निकाह उधळला

0

रामपूर। लग्नघटीका जवळ आली, मुलींच्या घरच्यांनी लग्नाची सर्व तयारीही केली. धुमधडाक्यात लग्न लागणार इतक्यात मात्र वराकडील मंडळींनी पंगतीत गोमांसाची मागणी केली. गोमांस नसल्यास लग्न मोडण्याची त्यांनी धमकीही दिली. त्यामुळे वधूने गोमांसाची मागणी धुडकावत लग्न मोडणे पसंत केले.

उत्तर प्रदेशातील रामपूरमधील तरुणीचे नात्यातीलच मुलाशी लग्न होणार होते. मुलाच्या घरच्यांनी लग्नाच्या पंगतीत गोमांस वाढण्याची अट ठेवली होती. अन्यथा लग्न मोडण्याची तयारी ठेवा अशी धमकीही दिली गेली. त्यामुळे त्यांची मागणी धुडकावत वधूने लग्न मोडले आहे. मुलीच्या घरच्यांकडून वर पक्षाविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
याबाबत मुलाच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पटवाना ठाण्याचे प्रभारी राजेश कुमार तिवारी यांनी दिली.