मांसासाठी गाईंऐवजी डेक्स्टर हे प्राणी जास्त चांगले, स्वस्त आणि पौष्टीक असं आयर्लंडमधील एक पशुव्यावसायिकाचे म्हणणे आहे. भारतातील हिंसक बनलेल्या गोरक्षणवाद्यांना आयर्लंडची वारी करून आणल्यास गोहत्या बंदी ऐवजी डेक्स्टर प्रचार त्यांना करावासा वाटेल.
डेक्स्टर ही पशुधनाची आयर्लंडमधील पारंपरिक जात आहे. त्यांना कुरणं लागत नाहीत. सुकं गवत लागतं.ते इटुकले असतात. जास्तीतजास्त एक मीटर लांबं. नेहमीच्या गुरांपेक्षा आकारमानाने ३० टक्के लहान असतात. ते दूध देतात. त्यांचं मांसही चांगलं असतं कारण हाड कमी असतात. गरींबांची गाय असं डेक्स्टर हे प्राणी ओळखले जातात. खूपच शांत असतात ते. त्यांचे निर्बिजीकरण करावे लागत नाही की शिंगे कापावी लागत नाहीत. नॉर्थ मिल्टनमधील माईक लाफोरच्युन आणि त्यांची पत्नी एव्हेलिन यांनी २०१४ मध्ये डेक्स्टर कॅटल कंपनी काढली. त्यांच्याकडे आता ७५ डेक्स्टरचा कळपच आहे. तो २०० पर्यंत वाढवायचा आहे. त्यांच प्रजननही सोप्प असतं. गाजावाजा नसतो. लोकांनी गाईंऐवजी हे प्राणी वापरावे, असं लाफोरच्युन यांना वाटतं.