शहादा । तालुक्यातील वाघर्डे येथे आदिवासी वस्ती असलेल्या गावात सखाराम मोते यांनी स्वखर्चाने ग्रामस्थांच्या सहभागाने गोमाई नदीवर वनराई बंधारा बांधल्याने हा बंधारा परिसरातील नागरिकाना जिवन दान देणारा ठरला. शासनाने गेल्या अनेक वर्षापासून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम राबविली आहे. काही योजना फक्त कागदावर दिसतात. नुकतीच शासनाने जलशिवार योजना राबविली आहे त्यात नद्या नाल्यांचे खोलीकरण करणे बंधारा बांधणे यांचा समावेश आहे. मात्र सखाराम मोते यांनी कोणत्याही प्रकारची शासनाची मदत न घेता मनापासून परिसरासाठी काम करावे ही इच्छा होती. त्यांनी ती प्रत्यक्षात कृतीत आणुन दाखवली. एक चांगला आदर्श निर्माण केला ग्रामस्थांचे श्रमदान माध्यमातून सहकार्य केले. आज बंधार्यात कमरेपर्यंत पाणी साचले आहे.
परिसरातील विहिरींना लागले पाणी
भरपुर पाणी साठल्याने परिसरातील विहिरीना पाणी लागले आहे शिवाय शेतकर्यांना मोठा फायदा झाला आहे या वनराई बंधार्यामुळे 12 गावाना लाभ मिळणार आहे. या व्यतिरिक्त पुन्हा दोन बंधारे बांधण्याचा संकल्प सखाराम मोते यांनी केला आहे. या बंधार्यासाठी 2500 मोठ्या प्लास्टीकचा गोणपाट पिशव्या त्यात वाळु भरुन बंधारा बांधला सखाराम मोते यांनी जवळ जवळ 50 हजार रुपयापर्यंत स्वतः चा खर्च बंधार्याचा कामासाठी केला आहे. गोमाई नदीवर बंधार्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.