आत्महत्या की खूनचे कारण गुलदस्त्यात
शहादा । शहराला लागुन असलेल्या गोमाई नदीवरील पुलाखाली नदीचा पात्रात तरुणाचा मृतदेह आढळल्यांने खळबळ माजली असुन तरुणाची आत्महत्या की खुन आहे या संदर्भात वेगवेगळे तर्क वितर्क लावण्यात येत आहे. पोलीसाना हा गुन्हा आव्हान ठरणारा आहे. पाडळदा रस्त्याकडे जाणार्या गोमाइ नदीचा पुलाखाली एका अनोखी तरुणाचा मृतदेह नदीचा पात्रात पडलेला होता. आज सकाळी काही नागरीकाना तो दिसुन आला ही वार्ता वार्यासारखी पसरली. नदीकाठावरील वस्तीतील नागरीकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पोलीसाना माहिती मिळाल्यावर त्यानी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरिक्षक शिंदे यानी पंचनामा करुन सुरज तुकाराम ठाकरे रा.भादे ता. शहादा ठेकेदार याने दिलेल्या महितीनुसार शहादा पोलीसात प्रथम दर्शनी अकस्मात मृत्यू म्हणुन गुन्हा दाखल केला आहे. उशीरापर्यंत मयत तरुणाची ओळख पटली नव्हती पोलीस त्याचा शोध घेत आहे.
मयत तरुणावर हातावर नामदेव असे नाव गोंदले आहे. तर सुर्याचे चित्र गोंदले आहे साधारणत: मयत तरुणाचे वय 30 ते 35 वयोगटातील असल्याचे पोलीसानी सांगितले त्याचा पायावर जखमा आहेत. घटनास्थळी रक्त पडलेले होते. मयत तरुण जर पुलावरुन खाली पडला असता तर त्याचा हाता पायाला डोक्याला लागुन रक्तभंबाळ झाला असता आता मयत तरुण हा गोमाइ नदीचा पात्रात पोहचला कसा? आत्महत्या केली असेल तर तशा खुना नाहीत नेमका संबंधीत तरुणाचा मृत्यु कसा झाला हा संशोधनाचा विषय आहे. शहादा ग्रामीण रुग्णालयात शव विछेदन करण्यात आले असुन पोलीस गुंह्याचा तपास करीत आहे. शहादा पोलीसात प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यु म्हणुन गुन्हा दाखल केला आहे. मयताची ओळख पटल्यानंतर खरी माहिती उजेडात येणार आहे. पोलीस निरिक्षक संजय शुक्ल स्वत: लक्ष घालुन आहेत व त्यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक शिंदे तपास करीत आहे.