धुळे । केरळमध्ये गोमातेची हत्या करणार्या युवक काँगे्रसच्या पदाधिकार्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी गुरूवार 1 रोजी काँगे्रसी नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवित त्याचे दहन केले. दरम्यान आंदोलन करतांना पदाधिकार्यांनी पोलिसांपेक्षा अधिक समयसुचकता दाखविल्याने त्यांचे आंदोलन यशस्वी झाले.
काँग्रेसचे कधीकाळी गाय वासरू चिन्ह असल्याने त्यांचा ढोंगीपणा उघड झाल्याचा आरोप
यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गायीला हिंदू संस्कृतीत मातेचा दर्जा दिला आहे. तर ज्या काँग्रेसी नेत्यांनी भर रस्त्यात गायीची कत्तल केली त्यांच्या पक्षाचे चिन्हही कधीकाळी गाय-वासरु हेच होते. याच चिन्हावर निवडून येवून सत्ता भोगणार्या काँगे्रसींचा हा ढोंगीपणा असून केरळमधील युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांना फासावरच लटकवले पाहिजे. त्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेत भाजयुमो पदाधिकार्यांनी खोलगल्लीतील भाजपा कार्यालयापासून काँगे्रसी नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यासाठी महाराणा प्रताप चौकातील जागा निश्चित केली होती. मात्र त्याठिकाणी पोलीस आपल्या आधी पोहचले असून पुतळा दहन शक्य नसल्याचे लक्षात येताच भाजयुमो पदाधिकार्यांनी रस्त्यातच म्हणजे श्रीराम पेनसेंटरजवळ पुतळ्यांना फासावर लटकवित त्याचे दहन केले. या आंदोलनात भाजयुमोचे कुणाल चौधरी, सागर कोडगीर, स्वप्निल लोकरे, निनाद पाटील, सचिन जाधव, मुकेश बडगुजर, अमित भोसले, मयुर सुर्यवंशी, मयुर मोरे, मनोज पिसे, सचिन कायस्थ, पवन वाघ, गौरव माळी, पंकज बडगुजर, जॅकी चौधरी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.