वरणगाव । गोमाता म्हणजेच स्वर्ग चा मार्ग असून तिच्यात 33 कोटी देवतांचा वास आहे. एका गायीचे प्राण वाचविणे म्हणजेच पाच मंदीर बनविण्यासमान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत कमलेश मुनि महाराज यांनी केले. वरणगांव येथील वृंदावन गौशाळेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी गोरक्षण व संवर्धन, वृक्षसंवर्धन बेटी बचाव बेटी पढाओ, भ्रष्ट्राचार, व्यसनमुक्ती, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकता, अहिंसा परमोधर्म या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी कमलेश मुनि महाराजांसोबत तपस्वी घनश्याम मुनी, व सेवाभावी कौशलमुनी उपस्थित होते.
या यात्रेला डिसेंबर महिन्यात सुरुवात होऊन पदयात्रा इटारसी भोपाल कानपूरकडे प्रयाण झाली. या शुभारंभावेळी वृंदावन गोशाळेसाठी सुनिल संचेती यांनी फुलगांव रेल्वे गेट जवळील 2 एकर जागा गोशाळेसाठी उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल संचेती, अनिल संचेती, राजेंद्र खिवसरा, हुकूमचंद खिवसरा सचिन देडीया, गणेश लोढा, पंकज श्रीश्रीमाळ, जीवन देडीया, नितीन शिंपी, अतुल झांबरे, गुड्डु बढे, बाळा धनगर, संजय देडीया, नितिन लोढा आदी असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थीत होते.