गोरक्षकांकडून दोन महिलांना मारहाण

0

मंदसौर : मध्यप्रदेशातल्या मंदसौरच्या पश्चिम भागात गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून दोन मुस्लीम महिलांना गोरक्षकांनी मारहाण मारहाण केल्याची घटना घडली आहे. महिलांना कथित गोरक्षकांकडून मारहाण सुरू असताना अनेक लोक शांतपणे बघत मोबाईलवर व्हिडिओ शुट करत होते.

मारहाणीनंतरही या दोन महिलांना गोमांस नेत असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली. मारहाण झालेल्या मुस्लीम महिलांकडे गोमांस नाही तर म्हशीचे मांस होते असे पोलिसांनी सांगितले. मध्यप्रदेशात गोमांसावर बंदी आहे. म्हशीच्या मांसावर नाही. परंतु, या दोन महिलांवर विना परवानगी मांस घेऊन जात असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.