गोरक्षणाच्या नावावर गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही

0

राजकोट : गोरक्षणाच्या नावावर हिंसाचार आणि माणसांना मारण्याचे प्रकार होतील तेथील राज्य सरकारांनी अशा तथाकथित रक्षक नव्हे भक्षकांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार अमान्य असल्याचे नुकतेच सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी ही मागणी केली. राजकोट येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वामी शंकराचार्य आणि रिपाइं (ए) चे गुजरात राज्य अध्यक्ष अशोक भट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

गोरक्षणाच्या नावाने गुंडागर्दी
देशाचा विकास शांतता बंधुता आणि अहिंसेच्या मार्गानेच होणार आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये. गोरक्षणाच्या नावाने होत असलेला हिंसाचार, गुंडगिरी करून गायीला बदनाम करणारे हे रक्षक आहेत की भक्षक आहेत ? गोरक्षणाच्या नावाखाली अत्याचार खपवून घेणार नसल्याचा इशारा ना.रामदास आठवले यांनी यावेळी दिला .