नवी दिल्ली । गोरक्षणाच्या नावाखाली चाललेली कुठल्याही प्रकारची हिंसा ही थांबलीच पाहिजे, लोकांना आपल्या हातात कायदा घेता येणार नाही अशा शब्दांमध्ये बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने हिंसक गोरक्षकांना कानपिचक्या दिल्या आहेत. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार करणार्यांविरोधात कारवाई करावी अशी याचिका तुषार गांधी व तेहसीन पूनावाला यांनी केली असून त्यांची बाजू इंदिरा जयसिंग यांनी कोर्टात मांडली. त्यानंतर आपले निरीक्षण नोंदवताना न्यायाधीश दीपक मिस्रा यांनी गोरक्षकांना कठोरपणे खडसावले.