शहादा : तोरणमाळ येथील गोरक्षनाथ यात्राहून शिरपूरकडे परतत असताना भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला. यात दोन प्रवाशी ठार झाले आहे. तर ११ जण जखमी झाले आहेत. तुळशीराम वेलशा पावरा (वय ३०,हरी दोंदवाडा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पवन सखाराम पावरा (वय ४०) याला म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल करताना रस्त्यावर मृत्यू झाला. भाविकांची बुलेरो गाडी ३० फुट खोल दरीत कोसळली. कालापाणीजवळ सातपुड्याच्या दुसऱ्या पायथ्याशी नागार्जुन मंदिरानजीक ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
आज महाशिवरात्री निमित्त तोरणमाळ येथे गोरक्षनाथ यात्रा असते. यात्रेसाठी शिरपूर तालुक्यातील (एम. एच. ४१, ४८३६)या बुलेरो वाहनाने भाविक तोरणमाळ येथून यात्रा आटोपून गावी परत जात असताना सातपुड्याच्या दुसऱ्या पायथ्याशी असलेल्या नागार्जुन मंदिराजवळ रस्त्यात मोठा दगड आला त्यात चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन दरीत कोसळले.
जखमींना तात्काळ म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे व म्हसावद पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी घटनेची माहिती घेतली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच म्हसावद ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद शेलटे,डॉ. सागर वसावे, व्ही.पी.यादव, डी. सी. भावसार, के. जे. मोरे, आर. ए. गिरासे, जितेंद्र नकवाल ,सचिन नाईक, अर्जुन कुवर आदी कर्मचारी घटनास्थळी दोन रुग्णवाहिका घेऊन तात्काळ दाखल होऊन जखमींना रुग्णालयात दाखल करून उपचार केले.
अनिताबाई फुलाला पावरा (वय २९सेंधवा ),मेनका बाई सुनील पावरा (वय २५ वडगांव, सेंधवा),सुनीताबाई सुशील पावरा (वय ३२ शिरपूर ,रोहिणी) सुनील लालसिंग पावरा (१९ लाडगाव, सेंधवा ),कविता तुळशीराम पावरा (३८हरीदोंदवाडा),सुंदरलाल गल्या पावरा (२५ रोहिणी,शिरपूर) राजेश सखाराम पावरा (१० आंबा खांबा), उमाबाई पवन पावरा (२९ आंबा खांबा), पूजा तुळशीराम पावरा (१४ हरी दोंदवाडा ), साक्षी गोविंदा पावरा (३० रोहिणी नवापाडा) जितेश भिकला पावरा १६ आंबा खांबा )हे जखमी आहेत.