जळगाव : येथील जात पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर यांची महसूल उपायुक्तपदी बदली झाली आहे. गोरक्ष गाडीलकर हे जळगाव येथे अपर जिल्हाधिकारी होते. त्यानंतर त्यांची जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी त्यांना पदोन्नती मिळाली होती. दरम्यानच्या काळात कोविड नियंत्रणासाठी त्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नोडल अधिकारी म्हणून गाडीलकर यांनी आर्सेनिक अल्बम या प्रतिकारशक्ती वाढविणार्या औषधीचे संपुर्ण जिल्हाभरात यशस्वीरित्या वितरण केले होते. ही जबाबदारी पार पाडत असतांना त्यांनी कोरोनाशीही दोन हात करून त्याच्यावर मात मिळविली होती. आता त्यांची महसूल उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. ते उद्या दि. १७ रोजी उपायुक्त पदाचा पदभार घेणार आहेत.