मुंबई । संकटकाळी स्वतःचा बचाव अथवा संरक्षण करता यावे यासाठी गोराई विभागातील शिवसेना क्रमांक 9 आणि तायक्वांडो असोसिएशन ऑफ सबर्बन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिला व युवतींसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिला शाखा संघटक अश्विनी सावंत, कक्ष प्रमुख अजित सावंत, विनोद शिर्के यांच्याप्रमुख आयोजनाखाली तायक्वांडो आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांच्या प्रशिक्षणाखाली हे एक दिवशीय शिबीर भरवण्यात आले. या शिबिरात महिला व युवतींना बचावा संबधी काही महत्वाच्या टिप्स देत त्याचे प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले.
महिलांसाठी स्वसंरक्षण काळाची गरज
या शिबिरात गोराईतील महिला व युवतींचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की महिलांसाठी प्रशिक्षण ही आज काळाची गरज ओळखून शिवसेना महिला शाखासंघटक अश्विनी सावंत यांच्या मागणीनुसार आम्ही एकदिवशीय मोफत शिबीर आयोजित केले. कराटे हा केवळ व्यायाम प्रकार नसून महिलांसाठी ते कवच कुंडल आहे या कवच कुंडलाचा जो वापर करेल तो नक्कीच स्वतःचे रक्षण करू शकतो.