गोराडखेडा, हिरापुरात तरुणांच्या आत्महत्या

0

पाचोरा/चाळीसगाव । पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील 22 वर्षीय तरूणाने शेताच्या वादावरून झाडाला रूमाल बांधून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली तर चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील 22 वर्षीय तरूणाने आज दुपारी धावत्या रेल्वेखाली उडी घेतली. पाचोरा तालुक्यातील गोरडखेडा येथील रहिवासी मनोज वसंत मोरे (वय 22) या तरुण शेतकर्‍याने झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मनोज मोरेची शेती मोजून चारही बाजुंच्या सिमानिश्‍चितीचे काम सुरू होते. दरम्यान शेताच्या बाजूला असलेले शेतकरी शेती मोजणी करण्यात अडचणी निर्माण करत होते. या कारणाने उद्विग्न होऊन त्यांनी शेतात झाडाला रुमाल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेने गावातील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस कर्मचारी करीत आहे.

रेल्वेखाली उडी आत्महत्या
चाळीसगाव ते वाघळी रेल्वे स्थानकादरम्यान खरजई गेटजवळ अप रेल्वे लाईनवर किमी खांबा क्र.330/10/8 च्या दरम्यान भुसावळकडून मुंबइकडे जाणार्‍या धावत्या सचखंड एक्सप्रेससमोर संजय धर्मा पवार (रा. हिरापूर ता.चाळीसगाव) या चाळीसगाव येथील शेजवलकर यांच्या पेट्रोल पंपावर काम करणार्‍या 22 वर्षीय तरुणाने बुधवारी दुपारी उडी घेऊन आत्महत्या केली. चाळीसगावचे स्टेशनमास्टर यांनी खबर दिल्यावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तपास पोलीस नाईक सचिन वाबळे, हवालदार प्रदीप परदेशी करीत आहेत.