गोरेगावातील बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली; तीन जण ठार

0

मुंबई- गोरेगावातल्या पश्चिम भागातल्या मोतीलाल नगरमध्ये बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली आहे. या घटनेत तीन जणांचा  मृत्यू झाला आहे, तर ७ जण जखमी आहेत. गोरेगावात ही दुमजली इमारत कोसळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, बचावकार्य सुरू आहे.

मृतांपैकी एकाचे नाव रामू असे असून तो 22 वर्षांचा होता, तो बांधकाम मजूर असल्याचे सांगितले जात आहे. मंगल बनसा(35 वर्षं), मुन्ना शेख(30 वर्षं), शिनू (35 वर्षं), हरी वडार (3 वर्षं), शंकर पटेल(21 वर्षं), सरोजा वडार(24 वर्षं), रमेश निशाद (32 वर्षं) जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सिद्धार्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.