पुणे । ‘स्वच्छ भारत अभियान’च्या तिसर्या वर्धापनदिनानिमित्त हवेली तालुक्यातील गोर्हे बुद्रुक गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानास प्रारंभ झाला. हे अभियान 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती गोर्हे बुद्रुकचे सरपंच सचिन पासलकर यांनी दिली.या अभियानात स्वच्छ शाळा, शौचालयाचा वापर जनजागृती, स्वच्छता दिंडी, प्रभात फेरी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी सरपंच सचिन पासलकर, एन्व्हाएर्न्मेंट क्लब ऑफ इंडियाचे नीलेश इनामदार, जनआधारचे ललित राठी, सामाजिक कार्यकर्ते खुशाल करंजावणे, ग्रामसेवक एस. जी. खैरनार, ग्रामपंचायत सदस्य लहु खिरीड, कुंडलिक खिरीड, सुशांत खिरीड, सतीश पवार, सुजाता काशिद, बियाणी, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.या अभियानात गावातील सर्व घरातील प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात येणार आहे. व पहिल्या टप्प्यात तो सागर संकुल प्रकल्पाला पुनर्वापरासाठी देण्यात येणार आहे. तसेच या पुढील 15 दिवसांच्या अभियानामध्ये ग्रामस्थांना आपल्या घरातील प्लास्टिक कचरा जमा करून साठवणूक करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात गोर्हे बुद्रुक गावापासून झाली असून, सागर संकुल प्रकल्पांतर्गत गावात राबविण्यात येणार आहे.