गोलंदाजी,फलंदाजी भारताचे विजयाचे शिल्पकार

0

बंगळुरु । टिम इंडिया चा 274 आटोपला होता.188 धावांचे आव्हान होते त्यामुळे भारतीय गोलंदाजावर सर्व भार होता.ते आपल्या गोलांदाजीचा काय जादू दाखवितात.त्याचप्रमाणे भारतीय गोलंदाजानी आपल्या गोलदांजीची जादू दाखविली. टीम इंडियाने या कसोटीला कलाटणी दिली आणि 75 धावांनी विजय खेचून आणला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 112 धावांवर  बाद झाला. पहिल्या डावात पिछाडीवर असतांना दुसर्‍या डावात मोठी आघाडी घेऊ न शकलेल्या भारतीय संघाच्या गोलदांज आर.अश्‍विन ने दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलिया संघातील अर्धापेक्षा जास्त फलंदाजांना तंबूत पाठवून भारताचा विजयाचा मार्ग मोकळा केला.या विजयाबरोबरच भारतीय संघाने पुण्यातील पराभवाची परतफेड करत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

भारताने 75 धावांनी नाट्यमय विजयाची नोंद केली
’अपयश ही यशाची पहिली पायरी असते’ या वाक्यप्रचार प्रमाणे भारतीय संघाने दुसर्‍या कसोटीत कामगिरी करून दाखविली. पुण्यात मोठ्या धाव संख्येने पराभव मिळाला होता. टीम इंडियाचा दुसरा डाव आज 274 धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 188 धावांचे आव्हान होते.अजून पावणे दोन दिवसांचा खेळ शिल्लक होता.ऑस्ट्रेलिया संघाचे पारडे जड वाटत होते.भारताची विजयाची मदार सर्व फिरकी गोलंदाजावर होती. आर.अश्‍विन व अजय जडेजा या जोडीने आपली जादू दाखविली.भारताचा विजया पाया रोवला.अश्विनने 41 धावांत सहा जणांना तंबूचा रस्ता दाखवला आणि 112 धावांवरच ऑस्ट्रेलियाचा खुर्दा पडला. भारताने 75 धावांनी नाट्यमय विजयाची नोंद केली. कांगारूंच्या शेवटच्या सहा विकेट्स तर अवघ्या 11 धावांत गेल्या.

118 धावांची भागीदारी
या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयात टर्निंग पॉइंट ठरली ती चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी दुसर्‍या डावात पाचव्या विकेटसाठी केलेली 118 धावांची भागीदारी. दरम्यान, पुजारा आणि रहाणेच्या भागिदारीने मनोबल उंचावलेल्या भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 112धावांत गुंडाळण्याचा पराक्रम गाजवला. दुसर्‍या डावात अश्विनने 6 बळी घेत टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.या भागिदारीमुळेच भारताला ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 188 धावांचे लक्ष्य देता आले होते. पण पुजारा आणि रहाणेच्या भागिदारीने मोबल उंचावलेल्या भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव धावांत गुंडाळण्याचा पराक्रम गाजवला.

भारताला चांगली आघाडी
तत्पूर्वी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा जोडीने चौथ्या दिवसाच्या सुरूवातीला भारताला चांगली आघाडी मिळवून देण्यासाठी आश्वासक सुरूवात केली होती. रहाणेने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले, पण 52 धावांवर खेळत असताना मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर रहाणे पायचीत झाला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर करुण नायर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. रहाणे, नायर तंबूत दाखल झाले असतानाही मैदानात चेतेश्वर पुजारा तग धरून असल्याने भारतासाठी चिंतेची बाब नव्हती. मात्र, हेजलवूडच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजारा तिस़र्‍या स्लिपमध्ये झेलाबाद झाला आणि संपूर्ण स्टेडियमवर शांतता पसरली.

नाहक आक्रमक फलंदाजी केली
पुजारा 92 धावांवर बाद झाला. संघ अडचणीत असताना मैदानात टीच्चून फलंदाजीची गरज असतानाही भारतीय फलंदाजांकडून नाहक आक्रमक फलंदाजी केली गेली आणि संघाचा डाव गडगडला. अश्विनने मैदानात येताच चौकार ठोकून आक्रमकता दाखवली, पण पुढच्याच चेंडूवर अश्विन क्लीनबोल्ड झाला. वृद्धीमान साहाने नाबाद 20 धावा करून अखेरच्या क्षणी भारताची आघाडी वाढविण्याचा प्रयत्न केला. अखेरीस स्टीव ओकीफने इशांत शर्माला कव्हर्सवर झेलबाद करून भारताचा डाव 274 धावांमध्ये संपुष्टात आणला. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी जोश हेजलवूडने 66 धावांमध्ये 6 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात 90 धावांची जिगरबाज खेळी करणारा के. एल. राहुल ’मॅन ऑफ द मॅच’ ठरला.