‘गोलाणी’स्वच्छ व्हायलाच हवे, अन्यथा तिव्र आंदोलन

0

जळगाव । शहरातील मध्यवस्तीत उभ्या असलेल्या गोलाणी व्यापारी संकुलाची अवस्था अत्यंत गलिच्छ, नागरिकांना लाज वाटेल. अशी झाली असून सर्वत्र घाण,कचरा, गुटख्यांच्या पुड्या, थुंकी, मोकाट कुत्र्यांचा संचार आदी बाबींचे थैमान या संकुलामध्ये माजले आहे. या प्रकाराने व्यापारी प्रतिष्ठाण, पत्रकार, इतर सर्व कर्मचारी व ग्राहक त्रस्त झाले आहेत.याकरिता गोलाणी संकुलाची स्वच्छता त्वरित करणयात यावी. अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा असलेले निवेदन देण्यात आले.

अस्वच्छतेमुळे आरोग्यास धोका
गोलाणी व्यापार संकुलातील स्वच्छता गृहे स्वच्छ व सुव्यवस्थीत करण्यात यावी, एखादं असले तरी, त्यात पाण्याची व्यवस्था नाही. लिफ्टची तर अत्यंत दुरावस्था झाली आहे. हदयविकार, रक्तदाब, तसेच गुडघ्यांचे आजार असणार्‍यांचे हाल होत आहेत. याकरिता लिफ्ट सुध्दा त्वरित सुरू करण्यात यावी. सर्वत्र कचराकुडयांची व्यवस्था करण्यात यावी, गोलाणीची रंगरंगोटी करण्यात यावी,परिसर संपूर्ण स्वच्छ करण्यात यावा, अस्वच्छता करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई सुध्दा करण्यात यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देते वेळी व्यापारी प्रतिष्ठाणचे फीरोज पिंजारी, मुकेश काबरा, पत्रकार महिला पल्लवी भोगे, कर्मचारी पल्लवी पारखे, सुधीर बडगुजर, केतकी सोनार, जगमोहन ठाकूर, व्यापार्‍यांमध्ये पवन लाठी, नितीन भोसले, पंकज सूर्यवंशी, राजेश शिंदे, चेतन चौहान, चंदन गवळी, बंटी शर्मा, हर्षल पाटील, गणेश पाटील, फरीद खान संदीप महाजन, राजेश शिंदे आदी उपस्थित होते.