जळगाव। जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी काल गोलाणी मार्केटचे स्वच्छतेची पहाणी केली. यावेळी त्यांना काही गाळेधारकांनी त्यांच्या गाळ्यात अनाधिकृतपणे बदल केलेला आढळून आला. मार्केटमधील किती गाळेधारकांनी असा बदल केला आहे याचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश श्री. निंबाळकर यांनी दिले होते. यानुसार आज बुधवारी नगररचना विभागाच्या कर्मचार्यांनी सर्व्हेक्षणास सुरूवात केली आहे.
बुधवारी सर्व्हेक्षणात त्यांनी 330 दुकानांची तपासणी केली. यात त्यांना गाळेधारकांनी अनाधिकृत बदल केलेला आढळून आला. तसेच 100 ते 150 काही गाळे विनापरवानगी हस्तांतरण वापर करण्यात येत असल्याचे आढळून आले. तसेच 30 ते 35 गाळेधारकांनी अनाधिकृत गाळ्यांमध्ये अनाधिकृत बदल केलेले दिसून आले. हे सर्व्हेक्षण कनिष्ठ अभियंता समीर बोरोले व विजय मराठे यांच्या पथकाने केला. या सर्व्हेक्षणामुळे विनापरवानगी गाळेधारकांचे धाबे दणाणले आहे.