गोलाणी मार्केटमधून साडेचार लाखांचा मोबाईल साठा जप्त

0

जळगाव: गोलाणी व्यापारी संकुलात दुकानातून मोबाईल साहित्य बाहेर काढून व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सुरुवातील पाहणी केली असता व्यावसायिक मोबाईल विक्री करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे उपायुक्त वाहुळे यांनी मनपाच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाच्या पथकाला बोलावून कारवाई केली. दरम्यान,साडेचार लाखांचा मोबाईलचा साठा जप्त करण्यात आला.

बंद दुकानासमोर मोबाईलची विक्री
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिथीलता असलीतरी शॉपिंग कॉम्प्लेक्स बंदचे आदेश आहेत.मात्र शहरातील काही व्यापारी संकुलांमध्ये व्यावसायिक व्यवसाय क रीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच हॉकर्सदेखील आपली दुकाने थाटून नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन विभागातर्फे गेल्या काही दिवसांपासून कारवाईची मोहीम सुरु केली आहे. दरम्यान,रविवारी गोलाणी मार्केटमध्ये मोठी गर्दी असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना माहिती दिली. त्यानुसार आयुक्त कुलकर्णी यांनी उपायुक्त संतोष वाहुळे यांना पाहणी करण्याची सूचना दिली.त्यामुळे मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह पथकाने गोलाणी संकुलात पाहणी केली असता मोबाईल व्यावसायिक बंद दुकानाच्या बाहेर मोबाईल विक्री करत असल्याचे दिसताच कारवाई करत मोबाईलचा साठा जप्त केला आहे.

यांच्यावर केली कारवाई
को
रोना बाधितांच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्याचे मनपा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.मात्र तरीही काही व्यावसायिक लपून -छपून व्यावसाय करीत आहेत. दरम्यान, गोलाणी मार्केटमध्ये बंद दुकानासमोर पिशवीत मोबाईल आणून विक्री करत असताना क ारवाई करण्यात आली असून साडेचार लाखांचा मोबाईल आणि मोबाईलचे साहित्य जप्त करण्यात आले. सद्गुरु मोबाईल, सिध्दीविनायक मोबाईल,अष्ठ विनायक मोबाईल,नेहा मोबाईल,गोविंद मोबाईल,साईसागर मोबाईल,हरीओम मोबाईल,सम्राट मोबाईल,एसएस मोबाईल,बाबा मोबाईल,तिरुपती मोबाईल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.