जळगाव : शहरात दुचाकी चोरींचे सत्र कायम आहे. शहरातील गोलाणी मार्केट परीसरातील संतोष ज्यूस सेंटर दुकानासमोरून तरुणाची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
अजयसिंग नागेन प्रतापसिंग राजपूत (35, रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. सोमवार, 6 जून रोजी सकाळी 11 वाजता गोलाणी मार्केट येथे दुचाकी (एम.एच.19 बी.एल.3296) ने कामावर आल्यानंतर गोलाणी मार्केट परीसरातील संतोष ज्यूस सेंटरजवळ दुचाकी पार्क केली. सायंकाळी नऊ वाजता काम आटोपून ते घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना दुचाकी चोरीला गेल्याचे कळाले. शुक्रवार, 10 जून रोजी दुपारी साडेबारा वाजता शहर पोलिस ठाण्यात त्यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.