गोळवलकर गुरुजी विद्यालयात बालदिन साजरा

0

पुणे । गोळवलकर गुरुजी विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त बालदिन साजरा करण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका कल्पना धालेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी प्रसाद लागू यांनी पंडित नेहरूंबद्दल माहिती सांगून बालदिन साजरा करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष दिलीप बर्वे यांनी साने गुरुजींच्या आयुष्यातील अनेक प्रसंग संस्कारक्षम कथांमधून सादर केले. त्याद्वारे आईची महती पटवून दिली. मुले कथा ऐकण्यात रमून गेली होती.या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बर्वे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचेता महाजन यांनी केले. अभार प्रदर्शन अंजली पवार यांनी केले.