गोळवलकर गुरुजी विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

0

पुणेःअखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थे तर्फे दिनांक 24 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या नाट्यछटा व वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस समारंभ शनिवारी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात घेण्यात आला.यावेळी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या कार्यवाह सुजाता मवाळ, शैक्षणिक प्रमुख अपर्णा मोडक, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुचेता महाजन, शाळेचे पर्यवेक्षक दिग्रसकर सर, व प्रमुख पाहुण्या गीतांजली जोशी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर्णा मोडक यांनी व सूत्रसंचालन संस्थेच्या कोषाध्यक्षा शैला गिजरे यांनी केले.

नाट्यछटा व वक्तृत्व स्पर्धांमध्ये माधव सदाशिव गोळ्वलकर गुरुजी विद्यालयातील सार्थक फडके, अग्रणी साठे, सृजा घाणेकर, जान्हवी कुलकर्णी, ओजस गोखले, रोहन कुलकर्णी, मैत्रेयी जोशी, या विद्यार्थांनी फिरता करंडक शाळेला मिळवून देऊन यश मिळवून दिले. यावेळी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुचेता महाजन यांनी शाळेच्या प्रगती मधील मुलांच्या मोलाच्या वाट्याबद्दल जाणीव करून दिली. तसेच प्रमुख पाहुण्यांनी मुलांनी स्वतःहून वाचन व लेखन करावे यावर भर दिला. आभार प्रदर्शन भालेराव सर यांनी केले.