‘गोळवलकर’ विद्यालयातील विद्यार्थ्यांची भ्रमंती

0

पुणे । टिळक रोडवरील मा. स. गोळवलकर गुरूजी विद्यालयाची रणथंबोर, जयपूर, आग्रा येथे नुकतीच निवासी सहल जाऊन आली. 165 विद्यार्थ्यांनी या सहलीची सुखद अनुभूती घेतली. सदर सहलीचे नियोजन पुणे राज्य टूर फोरम यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. राष्ट्रातील लोकजीवन, संस्कृती, ऐतिहासिक वास्तू यांचे जवळून निरीक्षण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी प्रशाला दरवर्षी अशा निवासी सहलींचे विविध राज्यांमध्ये आयोजन करत असते, असे सहल प्रमुख सुभाष निंबाळकर यांनी सांगितले.

सदर सहलीच्या निमित्तने विद्यार्थ्यांनी त्रिनेत्र गणेश मंदीर, राजीव गांधी क्षेत्रीय प्राकृतिक विज्ञान संग्रहालय, आबानेरी येथील स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेेली पायर्‍यापायर्‍यांंची विहीर, जलमहल, हवाईमहल, सिटी पॅलेस, जंतरमंजर तसेच आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल या ठिकाणांना भेट दिली. रणथंबोर येथील जंगल सफारीचाही विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांच्या जाणीवांचा विकास व्हावा, सहकार्यशील वृत्ती जोपासली जावी, समायोजनाचे महत्त्व समजावे, भारतातील विविधतेतील एकतेचे दर्शन घडावे याकरीता अशा सहलींचे आयोजन केले जाते, असे प्रशालेच्या मुख्याध्यापिका लिना तलाठी यांनी सांगितले. अक्षय कुलकर्णी, प्रशांत जाधव, प्रिया जोशी व सानिका शिंदे यांनी या सहलीकरीता विशेष परिश्रम घेतलेे.