भुसावळ । माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांचे पुत्र व गोळीबारातील जखमी समीर अख्तर पिंजारी (24) यांची रविवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास जळगावच्या खाजगी रुग्णालयात प्राणज्योत मालविली. भुसावळात 5 जानेवारी 2012 रोजी झालेल्या गोळीबारात समीर पिंजारी (वय 24) हे जखमी झाले होते. तेव्हापासून ते कोमातच होते. तब्बल पावणेपच वर्षांपासून त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज रविवारी रात्री अखेर संपली. या प्रकरणातील संशयीत आरोपी सानिया कादरी यांची जळगाव जिल्हा न्यायालयाने या गुन्ह्यात निर्दोष सुटका केली होती तर माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपिल दाखल केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
जळगावात मालवली प्राणज्योत
जळगावच्या ऑर्कीड रूग्णालयात समीर यांच्यावर गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरू होते. रविवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालविली. त्यांच्या मृतदेहावर सोमवारी सकाळी शहरातील मुस्लिम कब्रस्थानात दफनविधी करण्यात येणार आहे. मयत समीर पिंजारी हे भुसावळातील माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांचे मोठे चिरंजीव असून त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ असा परीवार आहे.