एमआयडीसी पोलीसांनी संशयित विशाल अहिरेला केले न्यायालयात हजर
जळगाव । मित्राला जेवणासाठी घरी बोलावून एकाने चार इंच अंतरावरून थेट त्याच्या तोंडात गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याची खळबळजनक घटना मंगळवारी नागसेननगर येथे घडली. सुदैवाने यातील जखमीचा जीव वाचला आहे, तर संशयिताला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा एक जिवंत काडतूसही जप्त केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगरातील सागर रतन भालेराव (वय २३) वर त्याच्या नागसेननगरातील मित्र विशाल राजू अहिरे यांनी तोंडात गोळी झाडली. दरम्यान जखमी झालेल्या सागरने मित्र विशाल अहिरे याला घरी बोलावून पिस्तुलने जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळी मारली असल्याच्या जबाबावरून विशाल अहिरे याला अटक करण्यात आली होती. या संशयितांला गुरुवारी २१ रोजी न्या. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी विशाल अहिरेकडून गुन्हात वापरलेले पिस्तुल हस्तगत केले आहे.
दरम्यान पोलिसांनी त्याला पिस्तुल कोठून आणले याबाबत विचारले असता, त्याने याबाबत पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली आहे. दरम्यान पोलिस विशाल आहिरेची कसून चौकशी करीत आहे. दोन दिवसांची पोलिस कोठडी विशाल अहिरे याला एमआयडीसी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून गावठी पिस्तुल हस्तगत केले आहे. संशयित विशाल अहिरे याला न्या. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.