भुसावळ: बसस्थानकात गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपी अजय गिरधारी गोडाले (24) व त्याचा साथीदार किसन गणेश उर्फ गनू पचेरवाल (19) यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. न्यायालयात पुन्हा आरोपींना हजर केल्यानंतर 29 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींनी कट्टा कधी व कुणाकडून खरेदी केला तसेच त्यात किती काडतूस होते याबाबत चौकशी पोलीस कोठडीत केली जाणार आहे. तपास उपनिरीक्षक निशीकांत जोशी करीत आहेत.