भुसावळ : भुसावळ बसस्थानकात शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपी अजय गिरधारी गोडाले (24) व त्याचा साथीदार किसन गणेश उर्फ गनू पचेरवाल (19) यांना रविवारी रात्री वांजोळा रोडवर पोलिसांनी सापळा रचून पकडल्यानंतर त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीत आरोपींनी गावठी कट्टा कुठून व कधी आणला तर गोळीबारामागील कारणांचा उलगडा होणार आहे.