भुसावळ । शहरातील भारत नगरासह पवन नगरात गोळीबाराची घटना 25 रोजी रात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना होऊन दोन जण जखमी झाले होते. याप्रकरणी पोलीसांनी दोन संशयीतास ताब्यात घेतले असून एकास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पवन नगरात गुन्हेगारांच्या टोळक्याने केलेल्या गोळीबारात निखील झांबरे गंभीर जखमी झाला होता पोलिसांनी या प्रकरणी संशयीत आरोपी गौरव बढे, मुकेश भालेराव, नानु बॉक्सरसह अन्य तीन आरोपींविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला होता़. गुन्हेगारांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले असून पोलीसांनी श्यामल सपकाळे व सुशिल संजय इंगळे यांना ताब्यात घेतले आहे. यात जळगाव येथील पोलीस कर्मचार्याच्या मुलाचाही समावेश असल्याचे सुत्रांकडून समजते, पोलिस निरीक्षक वसंतराव मोरे यांना विचारणा केली असता याबाबत केवळ संशय असून संपुर्ण तपास केल्यानंतरच सत्यता बाहेर येईल.