गोळीबार प्रकरण ; आरोपींकडून गावठी कट्टा जप्त

0

भुसावळ : बसस्थानकात गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपी अजय गिरधारी गोडाले (24) व त्याचा साथीदार किसन गणेश उर्फ गनू पचेरवाल (19) यांना अटक करण्यात आली होती. आरोपींना न्यायालयाने सुरुवातीला दोन दिवस व बुधवारी पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस चौकशीत आरोपी अजय गोडालेने लपवलेला गावठी कट्टा काढून दिल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निशीकांत जोशी यांनी दिली. आरोपी गोडालेकडून बसस्थानकात झालेल्या गोळीबारात कट्टा व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे.