भुसावळ– बोदवड तालुक्यातील गोळेगाव येथील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळवल्याप्रकरणी संशयीत आरोपी किरण प्रकाश कोळी (20) विरुद्ध बोदवड पोलिसात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. 14 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. तपास पोलीस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.