गोवंश मांस तस्करीची टोळी सक्रीय

0

ठाणे । भिवंडी तालुक्यातील पडघा येथे मागील आठवड्यात आठ टन गोवंश मांसाची तस्करी करणारा ट्रक जप्त करून दोघांना अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच पहाटे उशीरा याच रस्त्यावर गोवंश मांसाची तस्करी करणार्‍या दोन ट्रकसह या वाहनांना एस्कार्ट करणारी एक कार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पडघा पोलिसांच्या मदतीने जप्त केली. या तिन्ही वाहनात तब्बल 14 टन गोवंश मांस आढळून आले आहे. ने पडघा येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी जयश्री दळवी यांनी घेतल्यानंतर एका भल्या मोठ्या खड्ड्यात मांस गाडून नष्ट केले. याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली. ट्रक चालक जब्बार गफ्फार शेख, रा. संगमनेर, अय्याज अजीज कुरेशी, रा. औरंगाबाद, असल फक्की मोहम्मद शेख अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरजोली टोलनाक्याजवळ कारवाई
बजरंग दलाचे कार्यकर्ते यतीन जैन यांना सुत्रांमार्फत या गोवंश मांसच्या तस्करीची माहिती मिळाली होती. त्यांनी तात्काळ पडघा पोलीसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलीसांनी पडघा नजीकच्या आरजोली टोलनाका येथे सापळा रचून कारवाई केली. त्याच वेळी या ट्रकना पळून जाण्यासाठी एस्कार्ट करणारी स्कार्पिओ कार भरधाव निघून जात असताना पोलिसांनी तिच्या समोर अडथळे टाकत तिला सुद्धा अडवून ताब्यात घेतले. त्यानंतर वाहतूकीद्वारे नेत असलेले विक्रीची शक्यता अधिक होती.

आरोपींचे मोबाइल पोलिसांनी केले जप्त
हे गोमांस मीरा भाईंदर, व कुर्ला मुंबई या ठिकाणी घेऊन जात असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. या कारवाईनंतर तक्रारदार यतीन जैन भिवंडीकडे येत असताना वडपे परिसरात त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रसंगावधान बाळगत यतीन जैन वडपेमध्ये असलेल्या आपल्या परिचितांच्या घरी गेले. विशेष या गुन्ह्यातील आरोपींचे मोबाईल जप्त केले.

गस्ती पथकांना पैसे दिल्याचा आरोप
ट्रक चालक व एस्कार्ट स्कार्पिओ मधील व्यक्तींचे संभाषणरेकॉर्ड असून त्यामध्ये महामार्गावरील पोलीस तपासणी नाके व गस्ती पथकांना पैसे दिल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या गोमांस तस्करी कारणार्‍या गुन्हेगारांना पोलिसांचे संरक्षण मिळत असल्याचा आरोप यतीन जैन यांनी केला आहे. तसेच मांसाचे नमुने पडघा येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी जयश्री दळवी यांनी घेतल्यानंतर एका भल्या मोठ्या खड्ड्यात मांस गाडून नष्ट केले असल्याचा आरोप जैन यांनी केला आहे.