गोवर- रुबेला लसीकरण जनजागृती शिबिराचा शुभारंभ

0

जि.प. अध्यक्षा उज्वला पाटील यांच्याहस्ते कार्यक्रमास सुरूवात
जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्यासह परीसरातील नागरीकांची उपस्थिती
कासोदा – येथील प्राथमिक आश्रम शाळेत गोवर- रुबेला लसीकरण जनजागृती शिबिराचा शुभारंभ मंगळवार 27 नोव्हेंबर रोजी जि.प. अध्यक्षा उज्वला पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन किशोरराजे निंबाळकर जिल्हा अधिकारी जळगांव , उपजिल्हाधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, मुख्‍य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव दिवेकर, आरोग्य अधिकारी डॉ.बी. एस. कमलापूरकर, आरोग्य सभापती दिलीप पाटील, गटशिक्षणाधिकारी एन.एफ.चौधरी, जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि.प. सदस्य व पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य एरंडोल, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व कासोदा परिसरातील सर्वच शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पत्रकार, पालक व ग्रामस्थांच्या उपस्थिततीत हा कार्यक्रम घेण्यात आला.

रूबेला लस विषयी दिली माहिती
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी गोवर-रुबेला लस विषयी माहीती दिली. गोवर रुबेला लस ही 9 महिने तर 15 वर्ष वयोगटातील बालकांना सर्व मुला-मुलींना दंडावर इंजेक्शन द्यावे, ह्या लसीचे १०० टक्के फायदे गोवर- रुबेला आजारापासून बालकांना संरक्षण मिळते ,गोवर रुबेला झालेल्या गोरोदर मातेपासून जन्माला येणाऱ्या बालकास अंधत्व मूकबधिर मतिमंद, हृदयात छिद्र नसणे व जन्मजात व्यंग इत्यादी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे गोवर -रुबेला लस टोचल्याने या आजाराहोण्या आधी संरक्षण मिळते. त्यासाठी रोटरी मिलेनियम चाळीसगांव यांनी गोवर- रुबेला लसीकरण जण जागृती अभियान सुरू केले असुन त्याची जिल्हास्तरीय सुरुवात कासोदा येथील प्राथमिक आश्रम शाळा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्यध्याक शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी श्रमदान केले शाळेच्या मुख्यध्यापिका सुरेखा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.