गोवर रुबेला लसीकरण मोहीम मंगळवारपासून सुरूवात होणार

0

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ दिलीप पोटोडे यांची माहिती

अमळनेर – तालुक्यात 264 शाळा व 267 अंगणवाड्या मधील 79857 विद्यार्थ्यांना गोवर रुबेला लसीकरण 27 नोव्हेंबर पासून करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जनजागृतीपर विविध शाळांनी गावातून रॅली काढली. अमळनेर तालुक्यासाठी 179 पथक तैनात ठेवण्यात आले असून प्रत्येक पथकात तीन सदस्य आहेत पहिल्या पंधरवड्यात शाळांमध्ये तर दुसऱ्या टप्प्यात अंगणवड्यांमध्ये लसीकरण करून राहिलेल्याना शेवटच्या आठवड्यात लसीकरण होईल तीन टप्प्यात काम करण्यात येणार आहे.

लसीचे दुष्परिणाम अथवा काही मुलांना त्रास झाल्यास उपाययोजना तैनात ठेवण्यात आली आहे तालुक्यातील शिक्षक, आशा, अंगणवाडी सेविका, समाजसेवी संस्था, रोटरी, लायन्स, निमा अशा संघटनांची मदत घेतली जाणार आहे. एक शाळा एकाच दिवशी पूर्ण करण्यात येईल बालमृत्यू दराचा सर्वत्र दुहेरी आकडा असताना अमळनेर तालुक्यात फक्त 7 आहे असेही डॉ पोटोडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पत्रकार परिषदेस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रकाश ताळे , न पा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन हजर होते.

शहरातून काढली जनजागृती रॅली
गोवर रुबेला लसीकरणाची विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शहर व तालुक्यात विविध ठिकाणी जनजागृती रॅली काढण्यात आल्या. मंगरूळ येथे कै. अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालय, जि.प.प्राथमिक शाळा, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून रॅली काढण्यात आली. शिक्षक सुहास खांजोलकर यांनी मुलींच्या मेहंदी स्पर्धा घेऊन त्यावर गोवर रुबेला लसीकरणाचे महत्व पटवून जनजागृती करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका जयश्री सोनवणे, त्याचप्रमाणे कलमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालय, झाडी येथील उदय माध्यमिक विद्यालय, देवगाव देवळी येथील महात्मा फुले विद्यालय, रणाईचे येथील आश्रम शाळा व माध्यमिक शाळेतर्फे जनजागृती रॅली काढण्यात आली.

यांनी घेतला सहभाग
डी.आर.कन्या शाळेतर्फे ही रॅली काढण्यात आली. यावेळी सरपंच हर्षदा संदीप पाटील, आरोग्य विभागाचे सी.एम.पाटील, आरोग्य सेविका जी.एस.वळवी, समिती सदस्य संजय पाटील, अशोक सूर्यवंशी, प्रभूदास पाटील, राजेंद्र पाटील, शशिकांत पाटील, राहुल पाटील, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, सीमा मोरे, प्रदीप पाटील, वस्ती शाळेचे भटु पाटील आदी उपस्थित होते.