एरंडोल – राज्यात राज्य शासनाच्या आदेशान्वये नोव्हेंबर महिन्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम घेण्यात येणार असुन त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील या लसीकरणाचा शुभारंभ २७ नोव्हेंबर २०१८ रोजी प्राथमिक आश्रम शाळा कासोदा ता.एरंडोल येथे सकाळी ९ वाजता होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील ह्या असतील तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि.प.आरोग्य सभापती दिलीप पाटील, जि.प. सभापती पोपट भोळे, जि.प.महिला बाल कल्याण सभापती रजनी चव्हाण, जि.प.समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, जि.प.सदस्य नाना महाजन, वैशाली गायकवाड, रंजना सोनवणे, एरंडोल पं.समिती सभापती रजनी सोनवणे, उपसभापती अनिल महाजन, सदस्य रेशामाबी पठाण, निर्मला मालचे, विवेक पाटील, शांता महाजन, मंगला राक्षे, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगाव शिवाजीराव दिवेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.जळगाव डॉ.बी.एस.कमलापुरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, गटविकास अधिकारी एस.बी.कुडचे, गटशिक्षणाधिकारी एन.एफ.चौधरी, बाल विकास प्रकल्प अधिकारी एरंडोल जि.एम.तडवी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.कैलास पाटील उपस्थित राहणार आहेत.
नागरीकांना उपस्थितीचे आवाहन
कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे व लहान बालकांना लसीकरणाचा डोस द्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एफ.आर.शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.एफ.शेख, डॉ.दिपक साळुंखे, डॉ.विकास भगत यांनी केले आहे.तालुक्यात ४९ हजार ८२५ नऊ ते दहा वर्ष वयोगटातील बालके असुन १९५ खाजगी व शासकीय शाळा आहेत.तालुक्यात ४८९ सत्रात पाच आठवडे लसीकरण मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एफ.आर.शेख यांनी दिली.