गोवर रुबेला लस दिल्यानंतर पाच विद्यार्थ्यांना उलट्याचा त्रास

0

सहा जण रुग्णालयात दाखल

पुणे : गोवर रुबेला लस दिल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास झाल्याची धक्कादायक घटना शहरातील दत्तवाडी परिसरातील एका शाळेत मंगळवारी घडली. यातील सहा विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत लसीकरण अधिकारी परिमल देशमुख म्हणाले, लस देण्यापूर्वी या विद्यार्थ्यांनी काही खाल्ले नसल्यामुळे त्यांना हा त्रास झाला आहे. रुबेला आणि गोवर उच्चाटनासाठी देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र या लसीचा काही विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याच्या घटना घडत आहेत.

उपचार सुरू

पुण्यातील दत्तवाडी परिसरात असलेल्या एका खासगी शाळेतील काही विद्यार्थ्यांना आज सकाळी हे लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर थोड्या वेळाने यातील काही विद्यार्थ्यांना उलट्या झाला आणि त्रास होऊ लागला. यामुळे 5 विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याला दत्तवाडी परिसरातील ग्लोबल रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जनता वसाहत परिसरातील महापालिका शाळेत चौथीमध्ये शिकणार्‍या पिंकी पवार (वय10) हिला दोन दिवसांपूर्वी लस दिली होती. त्यानंतर तिलाही त्रास झाल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिच्या अंगावर 10 गाठी आल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.