गोवर रूबेला जनजागृती पोहचली तमाशाफडात

0

* तळेगाव आरोग्य केंद्रातर्फे डॉ प्रमोद सोनवणे यांनी सादर केला वेग
* करजगाव याञेत भिमा-नामा तमाशा कलावंतासह जनजागृती
* किर्तनापाठोपाठ तमाशामध्येही 100 टक्के लसीकरणाचे आवाहन

चाळीसगाव – तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव अंतर्गत करजगाव येथे दत्त मंदिरासमोर याञेनिमित्ताने नामांकित भिमा – नामा तमाशाचा शो आयोजित करण्यात आला होता. या तमाशामध्ये गोवर रूबेला लसीकरणाची जनजागृती डॉ. प्रमोद सोनवणे यांनी करून संपुर्ण महाराष्ट्रात प्रथमच सरकारी योजनेचे सादरीकरण तमाशात जाऊन स्वतः राजपञित अधिकारी असुनही निव्वळ जनसेवेचा वसा व शासनाच्या योजना गोरगरिब जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याची भावना डॉ.प्रमोद सोनवणे यांनी व्यक्त केली.

यावेळी सुरवातीलाच लावणींचा नृत्यप्रकार झालेवर रोटरी मिलेनियम अध्यक्ष तथा तळेगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे यांनी उपस्थित 2 हजार युवक व नागरिकांचे गोवर रूबेला लसीकरणाबाबत सचिञ प्रबोधन तमाशा वगनाट्यरूपात करून जनजागृती केली व भारत सरकारच्या या मोहिमेत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील मुलां- मुलींसाठी तात्काळ सरकारी दवाखान्यात अथवा अंगणवाडी व शाळेत लसीकरण करून बालकांना संरक्षित करण्याचे आवाहन केले. उपस्थितांनीही होकारार्थी दाद देत डॉ. प्रमोद सोनवणे यांना प्रतिसाद दिला. प्रसंगी डॉ. सोनवणे यांचा करजगाव ग्रामस्थ व तमाशा कलावंताच्या हस्ते सत्कार करण्यात आला व गोवर रूबेला स्टिकर तमाशा कलावंताना जनजागृतीस्तव गाडीस लावण्यासाठी भेट देण्यात आले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
सदर उपक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस.कमलापुरकर, जि.प.सदस्य अतुल देशमुख, पं.स.सदस्य अजय पाटील, प्रिती चकोर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. आरोग्य सहाय्यक एल.सी.जाधव, विठ्ठल चव्हाण, आरोग्यसेवक विजय देशमुख, मनोज साबळे, करजगाव ग्रामपंचायत सदस्य श्री मोरे, तळेगावचे दादा देशमुख, चाळीसगावचे सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब महाजन व मिञपरिवार उपस्थित होते.