गोविंदाचा मृत्यू

0

पुणे । पुण्यात दहीहंडी साजरी करून घरी परतणार्‍या गोविंदाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बाईकवरून घरी परतताना बेशुद्ध होऊन कोसळल्यानंतर त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सागर पिंगळे असे मृत्युमुखी पडलेल्या 26 वर्षीय तरुणाचे नाव आहे. पुण्यातील कसबा पेठेतील श्रीकृष्ण मंडळाची दहीहंडी साजरी करून सागर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मित्रासोबत दुचाकीवर घरी जाण्यासाठी निघाला. तो दुचाकीवर मागे बसला होता. मात्र श्रीकृष्ण मंडळाजवळच तो अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळला. सागरला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.